Saturday, 7 November 2020

मन तळाशी साचतं...

पूर्ण दिवस काहीतरी काम किंवा काहीच काम नाही केलं तरी दिवस पूर्ण रिकामा होतो ... आणि आपणसुद्धा रीते... बराच वेळ मोबाईलवर घुटमळत राहतो , अनलिमिटेड इंटरनेट आहे ... सगळे दिग्गज कलाकार , फिल्म्स एका क्लिकवर उपलब्ध आहेत पण मन स्थिर नाही कुठेच होत... हे एक मिनिट ते दोन मिनिट असं काहीसं करत आपण मध्यरात्रीच्या दोन तासांना काडी लावतो आणि मग इथे येऊन जीव रमतो... 

https://open.spotify.com/track/5Hn7uZqDarw5VTNX1XluV3?si=uUpH9WKzQZ2eP0SA2TcJLg

मन तळाशी साचतं... !!


Monday, 8 June 2015

आज अचानक शाळेतल्या पिंपळाची पिंपळाखालच्या टाकीतल्या थंडगार पाण्याची ... उगाचच आठवण येतेय ....

आज अचानक
शाळेतल्या पिंपळाची
पिंपळाखालच्या टाकीतल्या थंडगार पाण्याची ...
उगाचच आठवण येतेय ....

मधल्या सुट्टीतली आमची football match
म्हणजे सगळ्या junior ना अगदी must watch ....

मराठी मधल्या धडे आणि कवितांमध्ये "अध्यक्ष " कोण ?
यावरून नव्हता वाद ...
आणि एकचलीय असली तरी सगळी समीकरणच होती बाद ....

इतिहासात अजून दोन "शिवजयंती" यायच्या बाकी होत्या ...
आणि मुख्य न्यायाधीशाच्या तीजोऱ्या जनतेपुढे उघडायच्या बाकी होत्या ....

क्रिकेटला आता इतक खो-खोच वावडं नव्हतं ...
कबड्डी आणि लंगडीच हि खास कुणाशी वाकडं नव्हतं ....

सामान्य माणसाच्या असण्याला तेव्हाही "अर्थ" नव्हता ....
आणि अफझलखानाच्या कोथल्याला कुणाचाच कधी विरोध नव्हता ....

कुणीतरी बोर्डात याव असा याही वर्षी साकडं होतं ....
द्रोणाचार्य आणि एकलव्याच इथेही थोडं वाकडंच होतं ....

प्रीलीमच्या वेळी कळून चुकल आमची झालीय आता पुरेवाट ....
सेंड ऑफच्या दिवशी नकळत डोळे भरले होते काठोकाठ ....

ती जादूची कांडी पुन्हा फिरेल काय ?? अशी रुखरुख मनाला वेड लावतेय ...

आज काय माहित ??

शाळेतल्या पिंपळाची
पिंपळाखालच्या टाकीतल्या थंडगार पाण्याची ...
उगाचच आठवण येतेय ....

Saturday, 22 October 2011

ढाक भैरी ...

ढाक भैरी ... एक अविस्मरणीय अनुभूती ...
कर्जत रेल्वे स्टेशन ला उतरल्यावर आपण पश्चिमेकडून बाहेर पडतो ... तिथून " टम टम " पकडून आपण २-३ किलोमेतर अंतरावर असलेल्या वदप गावात पोहोचतो ... आम्हाला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले होते ... संधीप्रकाशात आम्ही तिथे असलेल्या चार  पाच घरांवर battery चा उजेड पाडला .. तिथल्या दोन चार कुत्रांखेरीज आमची दाखल घ्यायला कुणीच नव्हता .... मग अमेय आणि निलेश जवल्य्च्या एका घराकडे वळले आणि वदपवरून ढाक गावात जाणाऱ्या रस्त्याबद्दल विचारणा केली ... थोडा पाणी प्यायलो आणि ढाक गावात एकाला फोन करून सहा जणांचा जेवण करून ठेवा असा पुंडलिक काळेने ( स्थायिक ) निरोप ठेवला ...

                    पुंडलिक व्यतिरिक्त तिथे असलेल्या दोन जणांपैकी एकजण तर्र होता ... आणि दुसरा बऱ्यापैकी कपडेपट असलेला .. आम्ही मुंबईहून आलोय हे कळल्यावर मी मुलुंडला यांना ओळखतो त्यांना ओळखतो अशी अवांतर आणि कुणालाही नको असलेली माहिती देत बसला ... आम्ही नेहमीप्रमाणे बर म्हणत ढाकच्या वाटेला लागलो ... ( एरवी आम्ही हवी असलेली माहिती देणार्यालासुद्धा भीक घालत नसतो , हा तर उगीचच बोर करत होता .आम्ही म्हणजे मी आणि निलेश .. आम्ही दोघेहि स्वतःला खूप शहाणे समजतो आणि दाखवतोही .. सिद्धेश समजतो पण दाखवत नाही ).  तिथे वदपला आमचं लक्ष एका लहान मुलाने वेधून घेतलं .. जेव्हा त्याने त्याला विचारलेले मोबाईल नुम्बेर घडाघडा म्हणून दाखवले ... आणि हो कर्जत स्टेशन वरून निघताना "दिवाडकर"चा वडापाव ज्याला मी आधी मुद्दाम "पाडगावकर" म्हणालो आणि नंतर "शिरवाडकर" म्हणालो ... तो कसा जगप्रसिद्ध आहे हे सांगत सिद्धेशने आमची दहा मिनिटे खाल्ली ... ( आमचं या ट्रेक चा आतापर्यंतची सनसनीखेज खुलासा म्हणजे अमेयचा 26X झूम चा कॅमेरा आणि निलेशच डोंबिवली स्टेशन वर अस्खलित इंग्रजी संभाषण ..... 

         बऱ्यापैकी अंधार गाठीशी घेऊन आम्ही धाक गावची पायवाट तुडवायला सुरुवात केली . एक छोटा चढ चढून गेल्यावर बऱ्यापैकी दमछाक झाली ... अपवाद सिद्धेश .. विश्रांती घेत .. चालत .. धापा टाकत .... चालतोय चालतोय  .. आणि अचानक एका ठिकाणी आल्यावर जाणवलं कि खूपच अरुंद रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला दरी आहे ... तेव्हा जरा टरकली ... मग त्यानंतर दोन -अडीच तासानंतर खूप दूर आम्हाला उजेड दिसला ...आणि जीव जरा शांत झाला ... थोडा जवळ जाऊन पाहिलं ते तिथल्या देवीचं मंदिर होतं. म्हणजे गाव जवळ आलं होतं . तिथून  गावात जाण्याची वाट पकडली ती कुणीतरी येतंय त्या दिशेने जाऊया या आशेवर ... त्यांच्या जवळ रानटी कुत्री होती ... बहुदा शिकारीला निघाली असावीत . 
  तिथून दिलीप धाके चा पत्ता विचारात गावात शिरलो आणि दिलीपला भेटलो . त्याच्या घरात मस्त सगळ्यांनी आपली धुड उताणी टाकली तेव्हा कुठे जरा हायसं वाटलं. रोशनच्या पायात गोळा आला तो काढण्यात एक तास गेला आणि तो पर्यंत जेवणहि तयार होतं .